Type Here to Get Search Results !

प्रा. डॉ. सुरेश पाटील यांचा ' दुर्गभ्रमंती मंडळा तर्फे सेवापूर्ती सन्मान....

संपादक: सदगुरु रक्षा न्युज 
चांदवड च्या नामांकित एस.एन.जे.बी. संस्थेचे कला , वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय चांदवड येथुन सेवानिवृत्त झालेल्या प्रा. डॉ. सुरेश पाटील व सौ. पाटील यांना चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाच्या वतीने... सन्मानचिन्ह , शाल , पुष्पगुच्छ देऊन ' सेवापूर्ती सन्मान ' करण्यात आला. 
         यावेळी प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी आयुष्यातील अनेक अनुभव कथन करत आपले मनोगत व्यक्त करताना सर्व सदस्यांचे आभार मानले. 
           प्रास्ताविक संजय पाडवी यांनी केले व शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. 
        यावेळी प्रशांत सुताने सर , प्रा. डॉ. मनोज पाटील , वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. स्वप्नील वाघ , प्रा. डॉ. जी. डी. शिंदे , प्रा. संदीप पगार ,  वेदांता स्कुल चे  संचालक विजय जाधव , ग्रामसेवक प्रकाश सूर्यवंशी , रतन दिवटे साहेब , ग्रंथपाल संतोष ठाकरे , संतोष सोनवणे , न्हनावे गावचे सरपंच कैलास गुंजाळ आदी दुर्गभ्रमंती मंडळाचे सदस्यांनी उपस्थिती नोंदवली.

Post a Comment

0 Comments