या पत्रात आषाढी पालखी वारी सोहळा 2024 च्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना आनंद होत आहे तर धार्मिक अधिष्ठान हे कायमच राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठे राहिले आहे आपले सरकार वारकऱ्यांचे सरकार आहे जगातील सर्वात मोठा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदाय परिचित आहे हा संप्रदाय तत्त्वज्ञान ज्ञानोत्तर भक्ती व समाजातील एकता या तत्त्वावर सक्रिय आहे महाराष्ट्राच्या उज्वल ज्ञान परंपरे मध्ये या संप्रदायाचा मोठा वाटा आहे विषय तत्वाने महिलांना विशेष अधिकार देण्यामध्ये संतांची मोलाची भूमिका बजावली आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासूनही पंढरीची वारी आजता गायत अखंड सुरू आहे संतांनी दिलेले तत्त्वज्ञान आपल्यासारख्या अखंड सेवावृत्त असणार्या विभूतीकडून समाज मनात कीर्तन प्रवचन व अखंड हरिनाम सप्ताह माध्यमातून प्रबोधन करीत राज्यसहित देशभर सुरू आहे पंढरीची वारी मध्ये वारकरी संताच्या विचाराची पताका घेऊन आपली दिंडी व सहकारी मोठ्या प्रमाणात सहभागी असतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हे दृष्टी पुढे ठेवत आम्ही आपणा सर्वांची सेवा करत आहोत आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी या माध्यमातून लक्षावधी भाविकांचे आरोग्य तपासणी करत सेवा करत आहेत सेवा करण्याचे भाग्य लाभले इंद्रायणी चंद्रभागा व तस्मय तीर्थ यांच्याशी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे पंढरपूर मंदिराच्या विकासासोबत राज्यातील अनेक तीर्थक्षेत्राच्या विकास आपल्या सरकारने सत्तेत येतात क्षणी तात्काळ केला वारीसाठी विशेष विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना लागू करत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना विमा कवच लागू केले आहे श्री गुरु आदिनाथ पासून आजतागायत ही दिव्य परंपरा प्रवाहित करणाऱ्या सकाला संतांच्या चरणी विनम्रपणे साष्टांग दंडवत करतो यासोबत आपले आशीर्वाद व सहकार्य आम्हाला अधिक बळ व ऊर्जा देतात असे या पत्रात नमूद केले आहे
संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रंबकेश्वर चे विश्वस्त हभप नवनाथ महाराज गांगुर्डे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले शुभेच्छापत्र.
June 14, 2024
0
चांदवड : संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्रंबकेश्वर चे विश्वस्त ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे तिसगाव चांदवड यांना आषाढी पालखी वारी सोहळा 2024 साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक पत्र देऊन शुभेच्छा दिल्या .
Post a Comment
0 Comments