सदगुरू रक्षा न्युज : सुनिलआण्णा सोनवणे
चांदवडः शुक्रवार, दिनांक ३१ मे २०१४ रोजी सायंकाळी ०५ वा. होळकरवाडा (रंगमहाल) चांदवड जिल्हा नाशिक. या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीच्या निमित्ताने " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव व अहिल्यादेवी सन्मान पुरस्कार " वितरण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रा.दत्तात्रय राजनोर यांचे ' अहिल्यादेवी चरित्रपर व्याख्यान ' झाले. व कर्तृत्ववान महिला मंडळांना " अहिल्यादेवी सन्मान पुरस्काराने " गौरविण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी सौ. मीनाताई कोतवाल , डॉ आत्माराम कुंभार्डे , भूषण कासलीवाल , सुनील कबाडे , पत्रकार महेश गुजराथी , विजय जाधव , अनिल काळे , कवी विष्णू थोरे , डॉ भूषण शिरूडे , सोनूपंत ठाकरे , अशोक व्यवहारे , मोहन शर्मा , पत्रकार हर्षल गांगुर्डे , पत्रकार धनंजय पाटील , परवीन बागवान , पोलीस निरिक्षक कैलास वाघ , सुरज चिंचोले , पुरूषोत्तम काकड , अंबादास आहेर , पत्रकार सुनील सोनवणे , पत्रकार सोमनाथ जाधव , विनोद सोनवणे, आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. प्राचार्य दत्तात्रेय बारगळ सर यांच्या मार्गदर्शनात " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती " चे सदस्य डॉ तुषार चिंचोले , प्रा विजय बढे , पिंटू गाढे , सचिन खैरनार , बाळा पाडवी आदींनी नियोजन केले. मान्यवरांच्या हस्ते पुढीलप्रमाणे महिला मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. १) श्री संताजी महिला मंडळ २) रक्षीता नारी आधार बहुउद्देशीय संस्था चांदवड ३) त्रिलोक महिला मंडळ , वरचेगाव चांदवड ४) शिवकृपा महिला मंडळ , लोहारगल्ली ५) श्री रेणुका देवी महिला भजनी मंडळ, चांदवड ६) चांदवड ब्राह्मण संघ महिला मंडळ ७) श्री महालक्ष्मी गुजराथी महिला मंडळ चांदवड ८) जय जिजाऊ महिला राष्ट्र सेविका समिती चांदवड ९) सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महिला मंडळ चांदवड १०) अहिरे सुवर्णकार महिला मंडळ चांदवड ११) नवदुर्गा महिला मंडळ , शिंपी गल्ली , चांदवड १२) स्व. माजी आमदार जे. डी. कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्ट चांदवड १३) मराठा महिला मंडळ , हत्तीखाना , चांदवड १४) छत्रपती संभाजी महाराज महिला मंडळ , टेलिफोन कॉलनी , चांदवड १५) राजांनी शिंपी समाज महिला मंडळ , चांदवड १६) श्री सप्तशृंगी देवी नवरात्रोत्सव मंडळ , श्रीराम कॉलनी , चांदवड १७) वीरशैव लिंगायत , चंद्रेश्वर महिला मंडळ , चांदवड १८) सावली गृप चांदवड १९) दिगंबर जैन महिला मंडळ , चांदवड २०) कच्छादेवी महिला मंडळ चांदवड २१) संत गाडगेबाबा महिला मंडळ चांदवड २२) राजराजेश्वरी महिला मंडळ चांदवड २३) गो-सिया महिला मंडळ चांदवड २४) लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ २५) कालिका देवी महिला मंडळ चांदवड २६) श्री सप्तशृंगी महिला मंडळ , डांबरविहीर चांदवड या महिला मंडळांना " अहिल्यादेवी सन्मान पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. रंगमहाल ( होळकर वाडा ) येथे राजगादी वरील अहिल्यादेवी यांचे मूर्तीचे शास्त्रोक्त पूजन पुरोहित भूषण दीक्षित यांनी केले. असंख्य महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. व मान्यवरांचे मार्गदर्शक भाषण झाले. सन्मान-पत्राचे वाचन कवी विष्णू थोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाडवी यांनी केले. आभार प्रदर्शन विजय बढे यांनी केले.
Post a Comment
0 Comments