चांदवड : पुणेगाव दरसवाडी पोहोच कालवा या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी शेतीला मिळेल व आपला परिसर सुजलाम सुफलाम होईल याच आशेवर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जमीन या कालव्यासाठी भूसंपादन करू दिली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली कोर्टाच्या निकालानंतर दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरीही अजून पर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही त्यामुळेच आज खडकजांब या ठिकाणी सदर कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरू होत असताना एकत्र येऊन शेतकऱ्यांनी सदरचे काम बंद करण्याचे ठरवले
व जर या अस्तिरेकरणाचे काम केले तर आमच्या जमिनीत पाणी हे मुरणार नाही व आम्हाला त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही कालव्याचे पाणी काय एक्सप्रेस कालव्याप्रमाणे न्यायचे आहे काय? असा संतप्त सवालच शेतकरी वर्गाने केला. व या ठिकाणी चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांना ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना सांगितल्या.
पुणे गाव कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाच्या संदर्भात चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांनी देखील त्यांना काम करण्यासआमचा कुठलाही विरोध नाही ,जेथे पाणी लिकेज असेल त्या ठिकाणीच अस्तरीकरणाचे काम करावे. पूर्ण कालव्यास अस्तरीकरण करण्याची गरजच नाही चांदवड तालुक्यातील शेतकरी वर्ग फक्त पाटातील पाणीच बघेल काय ? ते तर आम्ही टीव्हीवर किंवा चित्रांमध्ये सुद्धा बघू शकतो शेतकरी वर्गाला पाण्याची नितांत गरज असून रोटेशन ज्यावेळेस येईल त्यावेळी जमिनीत जर पाणी मुरले तरच पिकांना व द्राक्ष बागांना फायदा होईल व पाटाला आलेल्या पाण्याचे चीज होईल. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी फोन द्वारे नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाच्या अभियंता यांना शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
यावेळी प्रभाकर नामदेव जाधव ,सोमनाथ भीमराव कांडेकर, मनोज गवळी, भारत पगार, वैभव निफाडे, अंबादास निफाडे, राहुल उशीर, लखोजी महाले, बापू जाधव, अरुण जाधव, वसंत अहिरे, ज्ञानेश्वर कांडेकर, रामनाथ गुंजाळ, बापू पगार, किरण शेलार, अण्णासाहेब कांडेकर, बाजीराव नाना गुंजाळ, विलास कांडेकर विशाल पगार, भास्कर कांडेकर, गोरख सातभाई यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments