स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद ची एस एस सी परिक्षेच्या निकालाची परंपरा कायम...... सायुजता खुटे व अनिकेत खांगळ प्रथम
Sadguru RakshaMay 27, 20240
सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवद)
चांदवडः श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद. या विद्यालयाने याही वर्षी निकालाची परंपरा कायम राखली .यावर्षी एस.एस.सी. परीक्षेसाठी विद्यालयातून 105 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 103 विद्यार्थी पास होऊन विद्यालयाचा निकाल ९८. ९ इतका लागला. विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान १)कुमारी सायुजता दत्तात्रय खुटे वकुमार अनिकेत राजेंद्र खामगळ यांनी 92 टक्के मार्क मिळवून घेतला.२) कुमारी सिद्धी साईनाथ ठोके. हिने 91 टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.३) कुमारी वैष्णवी देवराम ठाकरे यांनी 89.40 मार्क मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.४) कुमारी श्रद्धा न्यानेश्वर गांगुर्डे व कुमार यश विलास ठाकरे यांनी 88.20 मार्क मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला.५) कुमारी रवीना शरद गांगुर्डे व कुमारी प्रतीक्षा संदीप ठोके यांनी 87.80% मार्क मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब रसाळ व सरचिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या🌹🌹🌹🌹🌹
Post a Comment
0 Comments