सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे ( दिघवदकर )
चांदवडः वडनेर भैरव येथील संप्रदायातील गायक व्यक्तिमत्व श्री सुभाष बाबुराव बेंडके उर्फ ह भ प गोटीराम बेंडके यांचा नाशिक सातपूर श्रमिक नगर येथे करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते दत्तयाग निमित्ताने गुरुजन म्हणून सन्मान करण्यात आला **चांदवड तालुक्यातून निवड झालेली ती एकमेव व्यक्ती असून त्यांना हा सन्मान शंकराचार्य विद्या नरसिंह सरस्वती यांच्या हस्ते शाल सन्मानपत्र आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले
* वडनेर भैरवतील वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्त्वाचा शंकराचार्य सारख्या हिंदू धर्माच्या प्रचारक अधिकारी व्यक्तीच्या हस्ते सन्मान होणे हे खरंच वडनेर करांच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद* आहे सन्मान कोणत्या क्षेत्रात कोणत्या व्यक्तीला मिळतो हे महत्त्वाचे नाही तर आपल्या गावातील एका व्यक्तीला हा सन्मान मिळत आहे म्हणजे संपूर्ण वडनेर करांचा हा सन्मान आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे म्हणून सुभाष महाराज यांचे अभिनंदन याकरता त्यांच्या रूपाने वडनेर करांचा सन्मान नाशिकला अनेक मान्य व्यक्तींच्या उपस्थितीत झाला सूत्रसंचालकाने वडनेर भैरव चे नाव अत्यंत आदराने घेत गोटीराम बेंडके यांना निमंत्रित केले हा खरा सन्मान आहे.वडनेर
भैरव ग्रामस्थांच्या वतीने गोटीराम बेंडके यांचे अभिनंदन.
गोटीराम बेडके हे वडनेरकरांचा अभिमान आहे केवळ खंदळ वाडी चा नाही असे आम्ही मानतो. खंडळवाडी हे काही गाव नाही ती एक वस्ती आहे,वडनेर भैरव ची ,जशी कोकण टेंभी , खतवड, माळ वस्ती . तेंव्हा खंडळ वाडी पत्ता म्हणून ठीक आहे पण कोणत्याही कार्यक्रम पत्रिकेत वडनेर भैरव हे गाँव असावे असे मला वाटते.चूक होत असल्यास क्षमस्व.
पुन्हा गावाचे नाव सतत गाजत ठेवणाऱ्या गोटिरम बेंडके यांचं अभिनदन. मित्रा मोठा हो गावाला मोठे कर ............त्यांचे अभिनदन सुरेश सलादे सर यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments