Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचा 97.13% निकाल.....श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे 135 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण....

 सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः  श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 97.13% लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा शैक्षणिक वर्ष 2023-24 या परीक्षेत विद्यालयातील 349 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी प्रथम क्रमांक कु.साई सुरेंद्र आहेर 95.40% द्वितीय क्रमांक यश दिपक बच्छाव 94.80% तृतीय क्रमांक सिद्धी प्रितिश डुंगरवाल 94.60%
चतुर्थ क्रमांक आदित्य अशोक आहेर 94.40% पाचवा क्रमांक प्रेरणा अविनाश कासव 93.60% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
विद्यालयातील प्रविष्ट 349 विद्यार्थ्यांपैकी 131 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 126 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 67 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
विद्यालयातील या गुणवंत विद्यार्थ्यांचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र  पारख यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रविंद्र पवार यांच्यासह 10 वी ला अध्यापन करणारे सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयातील सर्वच घटकांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments