Type Here to Get Search Results !

पुणेगाव धरणाच्या कालव्याचा पाण्याचा मार्ग बदलू देणार नाही : आमदार डॉ.राहुल दादा आहेर.

सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे  (दिघवदकर )      चांदवड: पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याद्वारे येवले करांसाठी स्पीडने लवकरात लवकर पाणी  नदीवर (60 किमी वर ) तीन मोऱ्या टाकून या ठिकाणी गेट बसवण्यात येणार आहे व हे पाणी दरसवाडी धरणात लवकरात लवकर पोहोचले पाहिजे असे नियोजित नियोजन करण्यात येत असून याचा संशय उर्दूळ, परसुल, भोयेगाव या परिसरातील शेतकऱ्यांना पडल्याने त्यांनी एकत्र येत सदर पाटावरच गेटच्या ठिकाणी जेथे गेट बसवणार आहे त्या ठिकाणी कामच बंद केले. व प्रकल्प विभागाचे अभियंता यांना जाब विचारला. याच घटनेची दखल घेऊन चांदवडचे आमदार राहुलदादा आहेर यांनी नांदूर मधमेश्वर प्रकल्प अभियंता व परिसरातील शेतकरी वर्ग यांची सदर पाटाच्या ठिकाणीच जागेवरच बैठक घेऊन चर्चेअंती शेतकरी वर्गाची समजूत काढली व सदरचा गेट हा आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळेस उद्भवेल अर्थात पाण्याचा फुगवटा जर जास्त असेल तरच हा गेट उघडला जाईल अन्यथा नाही. प्रत्येकी दहा किलोमीटर मध्ये या पद्धतीचे गेट बसवण्यात आले असल्याची माहिती सुद्धा या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे भाटगाव ते परसुल हे तीन किलोमीटर पर्यंत पाणी परसुल येथील धरणातूनच पुढे भोयेगाव व दरसवाडी धरणात जाईल अशा प्रकारचे लेखी आश्वासन देण्याचे प्रकल्प अधिकारी यांनी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर व परिसरातील शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केल्याने सदरचा वाद जागेवरच मिटवला . यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर, नांदूर मधमेश्वर धरणाचे प्रकल्प अधिकारी, कालवा कृती समितीचे अध्यक्ष तुकाराम सोनवणे यांचे समवेत परसुल, भोयेगाव व उर्दूळ येथील शेतकरी वर्ग  मनोज शिंदे, दिगंबर वाघ, समाधान आहेर, आर के मामा,  हौशीराम सोनवणे, भागवतआण्णा जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments