सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड देवळा मतदार संघाचे 20-दिंडोरी लोकसभा मतदार संघाअंतर्गत चांदवड विधानसभा मतदार संघामध्ये एकुण-296 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. चांदवड विधानसभा मतदार संघात एकुण मतदारांची संख्या 2,99 ,304 (पुरुष-156644 ,महिला-142660) इतकी आहे. सेना दलातील मतदार-1133 आहेत.एका मतदान केंद्रास एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई ,एक पोलीस कर्मचारी याप्रमाणो नेमणुक केली आहेत मतदार संघासाठी एकुण मतदान कर्मचा-यांची संख्या-1300 इतकी (राखीवसह) आहे. तसेच 24 क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. एकुण 148 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा असणार आहे. ज्यामुळे मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाज निवड्णुक निर्णय अधिकारी स्तरावर पाहता येणे शक्य होणार आहे.
लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2024 साठीची चांदवड देवळा मतदार संघाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून सुमारे दोन हजार कर्मचारी,अधिकारी,पोलीस 296 केंद्रावर रवाना झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी,देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2024 साठीची चांदवड देवळा मतदार संघाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून सुमारे दोन हजार कर्मचारी,अधिकारी,पोलीस 296 केंद्रावर रवाना झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी,देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
चांदवड शहरातील 2 मतदान केंद्र हे महिला कर्मचा-यांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहे. तर चांदवड शहरातील 1 व लोहणेर येथील 1 मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र असणार आहे. तसेच चांदवड तालुक्यातील मंगरुळ व देवळा तालुक्यातील गुंजाळ नगर येथे युवा कर्मचा-यांनी चालवलेले मतदान केंद्र असणार आहे. आणि विजयनगर तालुका देवळा येथे दिव्यांग कर्मचारी यांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहे.
मतदान कर्मचा-यांना वाहतुकीसाठी एकुण-42 बसेस व जिप-35 व 24 खाजगी वाहने उपलब्ध केले आहेत. दि. 19 मे रोजी सकाळी सहा वाजेपासून या सर्व बसेस व खाजगी वाहने मतदान साहित्य घेण्यासाठी तहसिल कार्यालय चांदवड येथे जमा होते.बाहेरगाव वरुन येणा-या मतदान कर्मचारी यांची खाजगी वाहने श्रीमती. उषाराजे होळकर विद्यालय मैदानावर लावण्याची सोय करण्यात आलेली होती.
चांदवड तहसीलदार कार्यालयास आज सकाळपासूनच यात्रेचे स्वरुप आले होते. सर्वत्र मतदान साहित्य घेण्यासाठी गर्दी झालेली होती. मतदानासाठी आवश्यक असणारी मतदान यंत्रे घेऊन कर्मचारी रवाना झाले. तसेच मतदारांना मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ ) हे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या मार्गदर्शनासाठी असणार आहेत.
तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती हे ही मतदारांच्या सुविधेसाठी असणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर उपलब्ध असतील असेही प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मिलींद कुलकर्णी यांनी सांगीतले. दरम्यान मतदान कर्मचारी व अधिकारी यांना मेडीकल किटसुध्दा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या किट मध्ये ब्रेडेंज, ग्लोकोज डी पावडर, क्रोसींग गोळ्या , सोप्रामायसीन टयुब, आयोडीन, ओ.आर.एस. पावडर व गरजु साहित्य असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment
0 Comments