तिसगाव येथे भवानीमाता यात्रेत भोवाडा मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न
May 10, 2024
0
दिघवद : तिसगाव येथे भवानीमाता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आखडी किंव्हा भोवाडा अशे संबोधले जाते ह्या कार्यक्रमाचे आयोजन सात दिवस करण्यात येते गेल्या दहा वर्षांपासून हा भोवाडा बंद झाला होता सरपंच मिराबाई संजय गांगुर्डे व गावातील ग्रामस्थांनी आखाडीचे नियोजन करून यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध देवतांची वेशभूषा व मुखवटे धारण करून रोज रात्री लहान थोरांच्या हस्ते वाजंत्री लावुन नाचुन मिरवण्यात आले प्रथम भालदार चोपदार येणार्या मुखवटाधारी देवतेचे जोरदारपणे आरोळी आरे गावचा पारे गाव मखमली मांडव मोत्यांचा तुरा शारजा गणपतीची स्वारी येत आहे हो सावधान अशी गर्जना केल्यानंतर गावातिल वेशितुन संबंधित ज्या मुखवटयाचा नंबर आहे त्याचे आगमन होते यावेळी प्रथम निबदेव नंतर नारदमुनी शारजा गणपती सरस्वती छंबुक छंद चंद्र सूर्य संक्रांत कच्छ अवतार मच्छ अवतार एकादशी महादेव नंदि कार्तिक स्वामी गजासुर खंडेराव महाराज घोडा मदन महाराज नवनाथ महाराज विरभद्र वराह वेताळ महाराज इंद्रजित राम लक्ष्मण सीता माता हनुमान गरुड रावण भिमाचा अवतार नरसिंह अवतार म्हसोबा व देविची भव्य मिरवणूक काढुण महाप्रसाद वाटप करण्यात आला
Post a Comment
0 Comments