Type Here to Get Search Results !

पारंपारिक देवी उत्सव (श्रीराम रोड आखाडी)२०२४ बल्ली पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न....


 सदगुरुरक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
श्रीराम रोड मित्र मंडळ चांदवड च्या वतीने पारंपारिक देवी उत्सव ( आखाडी ) चे बल्ली पूजन सोहळा संपन्न... 
             आज पारंपारिक पद्धतीने बल्ली पूजन करण्यात आले.  यावेळी  श्रीराम मंडळाचे  आधारस्तंभ  माजी आमदार  शिरीषकुमार कोतवाल,  जगन्नाथ राऊत यांच्या  मार्गदर्शनाखाली अध्यक्ष  मुकेश राऊत,  उपाध्यक्ष   मुकेश  कोतवाल, योगेश बिरार,   खजिनदार प्रशांत राऊत,  नीलेश जाधव,  सदस्य प्रशांत  परदेशी, अनिल राऊत,  निखील राऊत,   महेश खंदारे,  राहुल वडनेरे,  विशाल गवळी, विशाल जोजो कोतवाल,   महेश व्यवहारे , आदि पंचांसह अशोक काका व्यवहारे , पत्रकार महेश काका गुजराथी , सचिन राऊत , बाळा पाडवी , गोपाल पारवे , गोपी बडोदे , सुनील बिरार , गुड्डू खैरनार , संजय शेळके , भावडू शेलार , बबलू गवळी , उमेश सोनवणे , बल्ली पूजनाचे पौरोहित्य अरुण काका दीक्षित व भूषण दीक्षित यांनी केले. 
          याप्रसंगी असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बल्ली पूजनासाठी वरचे गाव सोमवार पेठ व गुजरात गल्ली मार्गे श्रीराम रोड येथील श्रीराम मंदिर येथे सवाद्य  मिरवणूक काढून बल्ली पूजन करण्यात आले.
          यावेळी श्रीराम रोड मंडळाच्या वतीने उपस्थित त्यांचे आभार मानण्यात आले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्वांनी शिस्तीचे पालन करत देवी उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments