दिघवद येथे यात्रा निमित्ताने तांगा शर्यती मोठ्या उत्साहात...... शर्यतीत सायकल व घड्याळ वाटप
May 09, 2024
0
दिघवद : येथे सालाबादप्रमाणे जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रा संपन्न होते यावेळी जगदंबा माता रथ व रात्री लोकनाट्य तमाशा मंडळ आधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी खंडेराव महाराज यात्रा सुरू होऊन सलग सहा दिवस नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणचे वाघे मंडळ येऊन जागरण गोंधळ हा कार्यक्रम संपन्न झाला व सायंकाळी रेवन गांगुर्डे यांच्या हस्ते बारा गाड्या वाढण्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर टांगा शर्यत व कुस्त्यांच्या आयोजन करण्यात येत असते पण चालू वर्षी दुष्काळाचे सावट असल्याने कुस्त्या न करण्याचे पंच कमिटीने ठराव केल्याने फक्त टांगा शर्यत करण्यात आले यावेळी पाचशे ते चार हजार रुपये व सायकल व घड्याळ जिंकलेल्या खेळाला देण्यात आले यावेळी हभप देवराम मापारी यांच्या स्मरणार्थ तानाजी मापारी व परीवारा तर्फे सायकल व घड्याळ देण्यात आले तशेंच या खेळात जे बैल उत्कृष्ट धावले त्या खेळाला गावातिल ग्रामस्थांनी वयक्तिक बक्षीस दिले यावेळी नाशिक जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील तांगा शोकिन आले होते यात्रेसाठी दिघवद सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ तंटामुक्त समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य व खंडेराव महाराज यात्रा उत्सव समिती व जगदंबा माता यात्रा समिती सिध्देश्वर मित्र मंडळ भजणी मंडळ व तरुण मित्र मंडळ दिघवदग्रामसथांनी विशेष परिश्रम घेतले
Tags
Post a Comment
0 Comments