सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः ही घटना फक्त माझ्याच गावची नाही तर अख्या हिंदुस्थान ला सांगणारी आहे की मानसिकता खरच एवढी नराधम झाली का?
काय चुक होती त्या निरागस चिमुरडीची
आठ वर्षाची लहान बालिका....
ही घटना कानावर पडल्यावर ह्रदय पिळवटुन गेले.
नराधम हा नराधमच असतो.लहान जिवावर अत्याचार करुन विहरीत टाकून हत्या केली
अशा नराधमाला जर शिक्षा झाली नाही तर उद्या उठुन अशे अनेक नराधम अशे कृत्य करायला अजिबात घाबरणार नाहीत.
कोण तो फार वाईट शब्द येतात अश्या लोकांसाठी.जास्त शब्दप्रयोग करु शकत नाही.
अरे ती फक्त चिमुरडी कोणाची तरी मुलगी आहे बहीण आहे.जर आज हे प्रकरण शांत झाले तर उद्या उठुन कोणीही तुमच्या आमच्या व्यक्तींवर असे करु शकतात.
निषेध हा झालाच पाहीजे.
सध्या राजकीय नेते प्रचारात बिजी
आणि नॅशनल मिडीया बिजी आहे राजकारणाच्या घडामोडीत त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष दीले पाहीजे.हे जर असच चालु राहील तर अवघड आहे त्यामुळेच
आज चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने चांदवड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चांदवड तालुका सकल मराठा समाजाचे डॉक्टर दवंडे, आबा गांगुर्डे, प्रकाश शेळके, बाळासाहेब गाडे(फौजी), माणिक शिंदे, मंगेश शेळके, सुनीलआण्णा सोनवणे,देवा पाटील, प्रकाश कोतवाल, कारभारी शिंदे, राजेंद्र शिंदे, राहुल पवार, पंडितराव शिंदे, किसनराव साठे,अशोक कोतवाल, गोरख निकम,शिवाजी ठाकरे, सुरज भोसले, माणिक देशमाने, गौरव देशमाने यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाला सहकार्य करा.पोलीस प्रशासन लवकरच कारवाई करतील हीच अपेक्षा.
Post a Comment
0 Comments