चादवडः मा. गणेश फुलसुंदर उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद नाशिक आणि मा. उदय देवरे उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १८ एप्रिल २०२४ श्रीम.के.बी.आबड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे बागलाण, चांदवड आणि देवळा तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या २५० मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी गणेश फुलसुंदर यांनी पुढील सूचना देत उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले;
१ मे या निकालाच्या दिवशी विद्यालयात आजी-आजोबा मेळावा, माता पालक मेळावा आयोजित करण्यात यावे.तसेच विद्यालयातील मुख्याध्यापकांनी सेल्फी उपक्रम राबवून मतदान जनजागृती करावी. लग्नसमारंभ, वाढदिवस यासारख्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मतदान जनजागृती साठी विशेष प्रयत्न करण्यात यावे.
उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी १८ एप्रिल ते २० मे पर्यंत घ्यावयाचे विविध उपक्रम आणि मुख्याध्यापक ग्रुप वर येणाऱ्या मतदान जनजागृती विषयक माहितीचे संदेश वर्ग शिक्षकांमार्फत पालकांपर्यंत पोहोचवावे तसेच आपल्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केले असल्याची नोंद घेऊन त्याचा देखील दस्त तयार करावा. त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती जिल्हा परिषदेच्या ईमेल आयडीवर पाठवावी आणि त्याचा देखील संग्रह शालेय दप्तरी ठेवावा. हे सर्व उपक्रम सध्या विद्यार्थी शाळेत नसताना देखील शिक्षकांनी राबवायचे आहेत. अशा सूचना देत उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
नाशिक जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा या अनुषंगाने आयोजित केलेल्या बागलाण, चांदवड, देवळा तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेसाठी रामचंद्र बोडके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चांदवड, वसंतराव खैरनार विस्तार अधिकारी (शिक्षण) पंचायत समिती चांदवड यांनी देखील उपस्थित मुख्याध्यापकांना मतदान केंद्रावर अद्यावत करायच्या सोयी सुविधा याविषयी मार्गदर्शन केले.
श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले संस्थेच्या मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.अजय दहाड आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments