Type Here to Get Search Results !

यंत्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चिकलठाणा येथे अभ्यास भेट.

 सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : येथील नॅक मानांकीत अ +दर्जाचे श्री नेमिनाथ जैन  ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील ग्रीव्हज कॉटन लिमिटेड या कंपनीला अभ्यास भेट आयोजित करण्यात आली यात सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.   
                 अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या क्षेत्रभेट उपक्रमात छत्रपती संभाजी नगर मधील ग्रीव्हज कॉटन लिमिटेड या इंजिन बनवणाऱ्या कंपनीला विद्यार्थ्यांनी भेट दिली या भेटीत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे इंजिन कसे बनविले जाते तसेच त्यांची टेस्टिंग कशाप्रकारे केली जाते याचे माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली ग्रीव्हज कॉटन ही इंजिन बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे या कंपनीत बनविलेले इंजिन इंडस्ट्रियल इंजिन्स, मरीन इंजिन, वेहिकल इंजिन्स बनविले जातात यादरम्यान मनुफॅक्चरिंग क्वालिटी टेस्टिंग या विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले प्रा.योगेश कुलकर्णी आणि प्रा.सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक अभ्यास भेट आयोजित करण्यात आली.
         सदर  औद्योगिक भेटीबद्दल     संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती,  विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व  महाविद्यालयाचे  समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व  महाविद्यालयाचे  समन्वयक  झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा, योगेश मोदी , अभिजीत मोदी  आदीसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य  
तसेच प्राचार्य डॉ.आर.जी. तातेड, उपप्राचार्य डॉ.एम.आर.संघवी ,विभाग प्रमुख डॉ.एस.डी.संचेती यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments