संपादक : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड: येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून नॅक मानांकित अ + दर्जाच्या एसएनजेबी संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागा मार्फत परीक्षा प्रक्रिया, संगणकीकरण व परीक्षा सुधार अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आगामी काळात आणखी बदल प्रस्तावित आहेत ते समजून घेताना परीक्षांचे जबाबदारी पूर्वक नियोजन करावे अशा सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच परीक्षा अधिकाऱ्यांना दिल्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संस्था चांदवड येथे नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी व प्राचार्य यांच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य सागर वैद्य, डॉ. बाकेराव बस्ते, डॉ. राजेंद्र भांबर, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा विभागातील छाननी व तलीनीकरण विभागाचे कुलसचिव प्रदीप लोखंडे परीक्षा समन्वय कक्षाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.गोकुळदास लोखंडे, प्रदीप कोळी उपकुलसचिव एस एन टी परीक्षा विभाग व नाशिक उपकेंद्राचे प्रमुख एस.वाय.बुरकुले, तंत्र समितीतील विक्रम सणगर, कनिष्ठ सहायक एकनाथ गाभाले, एम. डी. गुंजेगावकर यावेळी उपस्थित होते .शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच परीक्षा आयोजना संदर्भात इतरही सूचना यावेळी करण्यात आल्या.परीक्षा पद्धतीमध्ये काळानुरूप होणारे बदल नवीन शैक्षणिक धोरण आणि परीक्षा पद्धती वरील सर्व टप्प्यांवर आवश्यक असणारा व वाढत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आदींबाबत मार्गदर्शन केले. परीक्षा विभागामार्फत परीक्षा प्रक्रिया संगणकीकरण व परीक्षा सुधार या विषयांवर महाविद्यालयातील प्राचार्य महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांच्याशी अभिमुखता कार्यक्रम घेण्यात आला. r
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर संघवी, यंत्र विभाग प्रमुख व डीन ऍडमिन डॉ. एस डी. संचेती यांनी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक यांचे आभार मानले. यावेळी कळवण ,चांदवड ,देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला व निफाड तालुक्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख सहभागी नोंदवला.
सदर कार्यक्रमाबद्दल संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा, योगेश मोदी , अभिजीत मोदी आदीसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य व एसएनजेबी परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.
(डॉ. महेश काकडे यांचा सत्कार करताना संस्थेचे प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी समवेत सागर वैद्य व इतर मान्यवर आदी. )
Post a Comment
0 Comments