Type Here to Get Search Results !

उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे 35 स्त्रियांचे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरासाठी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ वसंत जमदाडे यांनी शस्त्रक्रिया पार पाडल्या. शिबिराचे नियोजन माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सूर्यवंशी व डॉ. अनंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय चांदवड चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ आव्हाड यांनी केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत अहिरराव यांनीही अनमोल सहकार्य केले सदर शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक येथून तज्ञ पथक पाचारण करण्यात आलेले होते.उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथील स्त्री रोग तज्ञ डॉ हर्षद जाधव यांनी तसेच डॉ विष्णू पालवे, डॉ सुरज सिंह मांडावत व भूलतज्ञ डॉ सुजाता वाघमारे व डॉ शशिकांत देवडे यांनी शस्त्रियागृहामध्ये कामकाज बघितले. शिबिर यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. जीवन देशमुख तसेच कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी औषध निर्माण अधिकारी व परिचारिका तसेच अंतर रुग्ण विभागातील सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा विभाग, क्ष किरण विभाग, सर्व वर्ग चार कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच आरोग्य विभाग पंचायत समिती चांदवड अंतर्गत कर्मचारी यांनीही  अथक प्रयत्न केले.
सदर शिबिरासाठी दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी लाभार्थ्यांना दाखल करून त्यांच्या सर्व प्राथमिक तपासण्यात तसेच फिटनेस ची तपासणी करून लाभार्थ्यांना दाखल करण्यात आले तसेच सर्व लाभार्थ्यांची यथोचित काळजी घेतली जात आहे

Post a Comment

0 Comments