Type Here to Get Search Results !

चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी हनुमान जयंती साजरी

 ‌‌
नासिक जिल्हा प्रतिनिधी :कैलास सोनवणे,दिघवद       ् चांदवड : तालुक्यात  ग्रामीण भागात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी  किर्तन भजन प्रवचन तसेच काही गावांमध्ये सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली
तर महापुजा पुरोहितांनी मंत्र घोषणांनी उत्सव साजरा करण्यात आला. तर वारकरी सांप्रदायाचे मंडळाच्या भाविकांनी टाळ, मृदग द्वारा अभंग, गौळणी  पाळणे व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी दिघवद, बोपाणे, हिवरखेडे, दहिवद, उर्धुळ, भोयेगाव, वाळकेवाडी, पाटे, कोलटेक, काजीसांगवी,  हिरापुर आदि गावात सकाळी गावा गावाततिल भाविक मंदिराच्या परिसरात मंत्रपठण व पुजण करण्यात आले. यावेळी दिघवद मंदिरात नाराळांचा व इतर प्रसाद मोठ्या प्रमाणात जमा झाला होता यावेळी उपस्थित भाविक व लहान थोरानां प्रसाद म्हणून वाटण्यात आला तर कोलटेक येथे कावडी धारकांनी गंगेच्या पाण्याने गावातिल हनुमान व इतरही देवी देवतांची जलपुजण करण्यात आले. डिजे च्या तालावर वाजत गाजत गावातुन मिरवणूक काढण्यात आली तर काजीसांगवी येथे गावात व रोओम येथील मंदिरात परीसरातिल भाविकांनी सत्यनारायण पूजा करण्यात आली व विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आलेल्या भाविकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली  यावेळी  रोओम  परीसरातिल व पिंपळ मळा  तशेच इनाम वस्ती वडाचा मळा   दिघवद शिवपरिसर येथील सोनवणे, ठाकरे, मेचकुल ,आहेर,   गांगुर्डे या सर्व परिसरातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments