Type Here to Get Search Results !

चांदवड येथे डॉ भारती ताई पवार यांचा प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत मेळावा संपन्न

सदगुरु रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : येथील सेलेब्रेशन लॉन्स येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांच्या प्रचारार्थ तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. सदर कार्यक्रमास महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मित्र पक्षांचे पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
विलासदादा ढोमसे, रघुनाव आहेर, विकास भुजाडे, मनोज शिंदे, आमदार राहुल आहेर, डॉ आत्याराम कुंभार्डे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उमेदवार डॉभारतीताई पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती ताई पवार, आ. डॉ. राहुल दादा आहेर, भाजपा नेते श्री. केदा नाना आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, श्री. भूषण कासलीवाल, जिल्हाध्यक्ष श्री. शंकराव वाघ, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, जेष्ठ नेते श्री. विलास दादा ढोमसे, श्री. बाळासाहेब माळी, भाजपा तालुकाध्यक्ष, श्री. मनोज शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री. रघुनाथ आहेर,शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. विकास भुजाडे, रासप तालुकाध्यक्ष श्री. गणेश गुमनार यांच्यासह महायुतीचे चांदवड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Post a Comment

0 Comments