चांदवड:- एन एम एम एस परीक्षेत श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होऊन विद्यालयाने घवघवीत यश मिळवल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी दरवर्षी विद्यालयामध्ये या परीक्षेच्या आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये आयोजित केलेल्या या परीक्षेमध्ये विद्यालयातील चैतन्य संजय पाटील या विद्यार्थ्यांने सर्वसाधारण प्रवर्गातून महाराष्ट्रामध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला असून शिष्यवृत्तीसाठी सुद्धा पात्र झालेला आहे. तसेच विद्यालयातील भावेश बाजीराव भामरे, चैतन्य रोहिदास पगारे, अनुष्का प्रितम डुंगरवाल, श्रद्धा गंगाधर बरकले, केदार प्रभाकर मार्कंड हे विद्यार्थी देखील शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहेत.
विद्यालयाच्या या यश संपादणूकीबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या परीक्षेमध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील स्पर्धा परीक्षा प्रमुख गंगाधर खैरनार, वैशाली भामरे, हंसराज मोरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रविंद्र पवार यांच्यासह विद्यालयातील सर्वच घटकांनी आनंद व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments