चांदवड: नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात तील करंजी खुर्द या ऐतिहासिक गावात होळकर घराण्याच्या गादीवर बसलेल्या एका महाराजांनी इंदोर या ठिकाणी समाज उपयोगी असलेली विकास गंगा प्रवाहित केली व होळकर घराण्याचे नाव वैभव मिळवून देण्यास मदत केली निफाड तालुक्यातील गोदाकाटी वसलेले करंजी खुर्द ही होळकरांची करंजी ऐतिहासिक पाऊलखुणांनी अनेक घडामोडींशी जोडली गेली अठराव्या शतकात होळकर घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा राज्याचे स्वराज्य व साम्राज्यात स्थान मिळवून दिले अहिल्याबाई होळकरांशी या गोदाकांचा अनेक वेळा संबंध आला होळकरांचे सरंजामी सरदार सटवाजी राजोळे माधवराव राजोळे व गोविंदराव राजोळे हे करंजगाव येथील त्यांचे गावचे वतन व चांदवड परगान्याची 130 गावांचे देशमुखी होळकर व राजोळे या दोन्ही परिवारामध्ये अर्धी वाटली होती यशवंतराव होळकर आल्यानंतर त्यांची विधवा पत्नी कृष्णाबाईंना उर्फ केसरबाई होळकर घराण्याला पुढे घेऊन जाण्यासाठी दत्तक पुत्र हवा असल्याकारणाने तेव्हा त्यांनी नाशिक जवळील व निफाड तालुक्यातील करंजी गावचे गंधारे करंजीकर कुटुंबातील एक मुलगा होळकर गादीवर बसण्यासाठी निवडला हा मुलगा म्हणजे मल्हारराव गंधारे मल्हारराव गंधारे यांचा जन्म करंजीत तीन मे अठराशे पस्तीस मध्ये झाला होता कृष्णा बाईंनी त्याचे नामकरण तुकोजी राजे द्वितीय असे केले तुकोजी राजे हे वयाच्या दहा वर्षापर्यंत करंजीतच वाढले तुकोजी राजे द्वितीय होळकर घराण्याचे अकरावी राजे म्हणून 17 जून 1844 रोजी गादीवर बसले तुकोजी राजे विकासात्मक सुवर्णकाळ म्हणून होळकर घराण्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नंतर नाव घेतले जाते तुकोजीराव होळकरांनी इंदूरची गादी 42 वर्ष उत्तम राज्यकवार कारभार करीत विकास पुरुषाची कर्तव्य बजावले इंग्रजांच्या वर्सेस स्वतःच्या काळात तुकोजीरावांनी समतोल राखीत इंदूर व त्याचा आसपासचा प्रदेश अनेक विकास कामे केली मध्य प्रदेशामधील रेल्वेच्या सुविधा असो रोजगार निर्मिती असो कापड गिरण्या असो टपाल व्यवस्था आरोग्य केंद्र दवाखाने इंजिनिअरिंग कॉलेज वन विभाग महसूल विभाग वर्तमानपत्रे सुरु केली तुकोजी राजेच्या नावाने त्यावेळी नाणी पाडली होती व इंग्रजांना एक कोटी कर्ज दिले होते सतावत ठेवण्यासाठी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना आर्थिक मदत दिली. इंदूर संस्थानाचे राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथा इंदूर संस्थानात रुड केली राजे तुकोजी होळकरांचा कार्यकाळ होळकर घराण्यातला श्रेष्ठ काळ मानला जातो वयाच्या 51 वर्षी 17 जून 1886 मध्ये त्यांचे निधन झाले महाराज तुकोजीराव होळकरांच्या जन्मस्थानाचे स्मृती आजही करंजीकर ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने तुकोजी राजे महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात अहिल्यादेवींनी करंजी या ठिकाणी दगडी बांधनी पद्धतीची धर्मशाळा काढलेली होती व टपाल व्यवस्था होळकर राज्याची शाखा करंजी या ठिकाणी होती आजही तुकोजी महाराजांच्या नावावरून तेथे तुकेशोर महादेव मंदिर असे उभारलेले आहे तुकेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात होळकर राज घराण्याचे दैवत म्हणजेच शिवशंकराची पिंड आणि भिंतीत असलेला गणपतीची मूर्ती तेथे तुकोजी महाराजांच्या जन्मदात्या आई वडिलांचे सुंदर अशा संगमरवरी मूर्ती आहेत तुकोजी राजे यांचे वडील गंधारे व आईच्या मांडीवर बसलेला बाळ मल्हार उर्फ तुकोजी राजे होळकर द्वितीय यांच्या मूर्ती पाहायला भेटतात मूर्तीच्या वर छोटे मल्हारराव यांना दत्तक घेणाऱ्या कृष्णाबाईंची मूर्ती आहे गोदा तीरावर स्वयंभू महादेव मंदिर आहे व मोठ्या आकाराचा घाट बांधलेला आहेत असे हे करंजी खुर्द महाराजा तुकोजीराव महाराज यांची जन्मभूमीचे गाव करंजी खुर्द समस्त ग्रामस्थ तुकोजी राजे यांचे चरणी तत्पर
सौजन्य करंजी खुर्द समस्त ग्रामस्थ मंडळ - श्रीमंत अमरजीत दादा बारगळ तळोदा जागीरदार
•∆श्रीमंत भाऊसाहेब राजोळे देशमुख 9604598516
•∆अध्यक्ष आण्णासाहेब सापनर पाटील
•∆व्याख्यते रामदास काळे
•∆श्रीमंत नानासाहेब होळकर
•∆श्रीमंत मुकुंद राजे होळकर
•∆प्राचार्य दत्तात्रय बारगळ
•∆श्रीमंत उमाकांत आहेरराव
•∆श्रीमंत नईम खान पठाण सरदार
•∆श्रीमंत वाईत भाई पटेल सरदार
•∆श्री आनंद ठाकूर शस्त्र संग्रह श्री संजय पाडवी, श्री भूषण कासलीवाल, श्री पप्पू शेठ भालेराव ,श्री सचिन खैरनार, श्री अमोल दीक्षित गुरुजी ,श्री कैलास गुंजाळ,( सरपंच), श्री भिमराज राजोळे, श्री चंद्रकांत भंडारे, श्री शहाजी राजोळे, श्री रामेश्वर राजोळे, पोलीस पाटील करंजगाव श्री हेमंत टिळे, श्री जगदीश पाटील, श्री संदीप राजोळे, श्री लक्ष्मण राजोळे, श्री डॉक्टर मनोज पगारे, श्री रामदास काळे, श्री मधुकर भांड, श्री प्राध्यापक उदय वायकोळे, श्री राजेंद्र राजोळे, श्री रुपेश पवार, श्री सुनिलआण्णा सोनवणे, श्री अनिल पिंटू राऊत, श्री गणेश राजोळे, श्री अथर्व लचके, श्री मेहबूब तांबोळी, श्री निलेश राजोळे, श्री वीरू शिंदे, चितळेकर काका, श्री संजय विरार, श्री संतोष गवारे ,श्री मच्छिंद्र बिडगर, श्री वैभव रोकडे, श्री नितीन साळुंखे व कार्यक्रमाचे आयोजक समाधान बागल.
Post a Comment
0 Comments