Type Here to Get Search Results !

दिघवद येथे जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन

नाशिक जिल्हा प्रतिनिधी: कैलास सोनवणे,दिघवद
दिघवद/ चांदवडः सालाबादाप्रमाणे दिनांक २४-०४-२०२४ ते ०१-०५-२०२४ या कालावधीत जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रेचे आयोजनदिगवत या ठिकाणी करण्यात आलेले आहे . २४-४ २०२४ रोजी सायंकाळी जगदंबा मातेचा रथ मिरवणूक होऊन रात्री लोकनाथ लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दिनांक २६-४-२०२४ पासून खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी घटस्थापना दत्तात्रय गांगुर्डे, हरिचंद्र शिंदे, धोंडीबाबा चौगुले, नाथ बाबा, अण्णा बाबा सोनेवाडीकर यांच्या हस्ते करण्यात येणारआहे व २६ रोजी रात्री देगाजी पुरकर आणि सह पार्टी जागरण गोंधळ तसेच २७ रोजी रात्री अनिल दुग्धे व सपना कुंदे गंगापूर व वाघे मंडळ व २८ रोजी रात्री अशोक शेळके नाशिक वाघे मंडळ २९ रोजी रात्री शिवराम व सह पार्टी तसेच 30 रोजी रात्री अण्णा जाधव व सह पार्टी गोंधळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ९ ते १२ काठी मिरवणूक व सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचे मानकरी श्री रेवन शिवाजी गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ०१-०५-२०२४ रोजी आरती महापूजा करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला चांदवड तालुका तसेच नाशिक जिल्ह्याचे वाघे मंडळ उपस्थित राहणार आहे.

Post a Comment

0 Comments