नासिक जिल्हा राष्ट्रीय कॉग्रेसच्या जिल्हाअध्यक्षपदी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल.
April 13, 2024
0
चांदवडः_नासिक जिल्हा कॉग्रेसचा डॉ. तुषार शेवाळे यांनी जिल्हाअध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्र राज्य कॉग्रेस कमेटीचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्हयातील कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांची एकमताने प्रभारी अध्यक्ष म्हणुन नेमणुक केली या निवडीचे नासिक जिल्हा तसेच चांदवड येथे कॉग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या जयघोषात स्वागत केले. यावेळी महाविकास आघाडीचे कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार ), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) या तिनही पक्षांचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहुन शिरीषभाऊ कोतवाल यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शांताराम भवर, राष्ट्रीय कॉग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संपतराव वक्टे, विजय जाधव, राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नंदुआबा कोतवाल, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रसाद प्रजापत, कॉग्रेसचे जेष्ठ नेते भिमराव जेजुरे, अमोल भालेराव, डॉः राजेंद्र दवंडे नंदकुमार कोतवाल, ज्ञानेश्वर, आदेश शेळके, सुभाष जाधव, शिवाजी कासव यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
Post a Comment
0 Comments