Type Here to Get Search Results !

भाजपा स्थापना दिनानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन व ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान...

              संपादक : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः ०६ एप्रिल भाजपा स्थापना दिनानिमित्त चांदवड नगरपरिषद परिक्षेत्रातील वरचेगाव चांदवड येथील ' के-मार्ट ' या किशोर क्षत्रिय यांच्या सुपर मार्केट येथे व शिवनेरी चौक येथे स्थापनादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
        यावेळी ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. 
       याप्रसंगी ज्येष्ठ भाजपा नेते सुरेश दादा जाधव , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहन काका शर्मा , प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक काका व्यवहारे , प्रभाकर शेठ क्षत्रिय , व्यापारी आघाडीचे महेश खंदारे , प्रशांत वैद्य , किशोर क्षत्रिय , सोनू आप्पा पवार , मनोज बिरारी , राहुल जाधव , सुनील क्षत्रिय , सुनील बिल्लाडे , सुधाकर बोरसे , नामदेव विसपुते , आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पाडवी , आदी ंसह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली.

Post a Comment

0 Comments