चांदवड- मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्रीमती-जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड, शाखेत रविवार दिनांक-१४/४/२०२४ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय लोहकरे सर, पर्यवेक्षक श्री. प्रकाश आहेर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड शाखेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक बंधू भगिनी , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments