देवळा तालुका प्रतिनिधीः कैलास पवार
देवळा : येथील देवळा कळवण रोडवरील तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला आजरात्री ठीक आठ वाजेच्या लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी (दि २६) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली. देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या मालकीच्या तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला शॉट सर्किटमुळे आग लागली.
देवळा येथील देवळा कळवण रोडवरील तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला आजरात्री ठीक आठ वाजेच्या लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी (दि २६) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली. देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या मालकीच्या तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला शॉट सर्किटमुळे आग लागली.
या आगीत ह्यात स्पेअर पार्ट, ऑइल, फर्निचर, कम्प्युटर , सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाले. यामुळे शेवाळे यांचे जवळपास 56 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ह्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सम्पूर्ण ऑईलसह, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली व तात्काळ पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. दुकानात विक्रीसाठी ऑईलअसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.

Post a Comment
0 Comments