Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीचे सुतारखेडे येथे शाखा फलक अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात

🎤उपसंपादक : संजय जाधव🎤
वंचित_बहुजन_आघाडीचा_झंझावात..!!! 
 विर एकलव्य यांच्या जयंती निमित्ताने चांदवड तालुक्यातील, सुतारखेडे येथे दिनांक 8/3/2024 शुक्रवार रोजी चांदवड तालुका अध्यक्ष संतोषभाऊ केदारे यांच्या हस्ते शाखा फलक अनावरण करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा मा.रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे, जिल्हा महासचिव संजयजी जगताप, यांच्या मार्गदर्शनाने वंचित बहुजन आघाडी ग्राम शाखा  फलकाचे उद्घाटन चांदवड तालुका अध्यक्ष संतोषभाऊ केदारे यांच्या  हस्ते करण्यात आले,या वेळी उपस्थित चांदवड तालुका महासचिव प्रवीण वानखेडे, तालुका उप अध्यक्ष,हिरामण मोरे, मनोज जगताप,तालुका संघटक ऋषिकेश बोराडे,सहसचिव संतोष जाधव, संकेत वानखेडे, अमोल वानखेडे, तालुका संपर्क प्रमुख सुकदेव जाधव,आत्माराम वानखेडे, शहानवाज शेख,दानिश भाई, सलीम सर, डॉ बाळासाहेब वानखेडे, तुषार जाधव, संदिप आहीरे, या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मा.ऊत्तम वानखेडे,व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती, यांच्यासह  चांदवड तालुका/ पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित सुतारखेडे शाखा पदाधिकारी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव वानखेडे यांच्यासह व तालुका प्रवक्ता संजय भडांगे यांनी आपले मनोगत व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
आभारप्रदर्शन सुतारखेडे शाखाध्यक्ष बाबाजी पवार व वैभव वानखेडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments