Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यम उच्च माध्यमिक विद्यालयात मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद...

🎤संपादक सुनिल आण्णा सोनवणे🎤
 चांदवड- श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्य .व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव नाशिक तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, चांदवड व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याप्रसंगी म.वि.प्र. संस्थेचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड, भास्कर भगरे माजी सभापती पंचायत समिती दिंडोरी , सौ. संगीताताई पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, सौ. साधना पाटील तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, सौ चित्राताई शिंदे शहराध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व सौ भारतीताई देशमुख जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार , डॉ विजया गायकवाड,सौ उर्मिला शेळके,सौ.स्वाती वाघचौरे,सरला शिंदे,सौ योगिता खांगल,सौ. वर्षा ठाकरे,जया कुभाडे,श्री दत्ता वाघचौरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी व काँग्रेसचे शरदचंद्र पवार ,श्री प्रकाश शेळके शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ,श्री अभिजीत ठाकरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार ,शालेय समिती अध्यक्ष सुभाष दादा कोतवाल शालेय  समितीचे सदस्य अशोक काका व्यवहारे, विजय कोतवाल ,डॉक्टर सतीश गांगुर्डे, डॉक्टर श्याम जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय लोहकरे पर्यवेक्षक प्रकाश आहेर प्राध्यापक शिक्षक शिक्षिका महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी म.वि.प्र. संस्थेचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजनाची आवश्यकता सांगितली. महिलांनी कोणताही संकोच न बाळगता मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले. सौ. संगीताताई पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी कोणत्याही प्रकारचे आजार अंगावरती न काढता वेळीच वैद्यकीय इलाज करून घ्यावा. तसे सौ. भारतीताई देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवावा व महिलांनी आपल्या शेजारच्या असलेल्या महिला व मैत्रिणी  यांच्यापर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी मोफत महिला आरोग्य तपासणी कक्षाचे उद्घाटन केले. मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास चांदवड शहर व परिसरातील गावातील अनेक महिलांनी उपस्थित राहून या शिबिराचा सरासरी 225 महिलांनी  लाभ घेतला.23 महिलांना मेडिकल कॉलेज आडगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.या शिबिरास  मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया नांदे त्यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ भारतीताई  देशमुख यांनी केले.यावेळी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय जाधव, अनिल पाटील ,शैलेश ठाकरे ,विक्रम जगताप, कैलास सोनवणे ,रिजवान घाशी , देवमन पवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments