Type Here to Get Search Results !

दुगांव येथे महिला दिनाचे औचित्य साधुन विरांगणा महिलाना मनसे महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे यांचे शुभहस्ते सर्टीफिकेट चे वाटप

🎤 संपादकः सुनिल आण्णा सोनवणे🎤
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष व दुगांव ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली व दुगांव ग्रामपंचायत चे सरपंच संजय सोनवणे यांचे प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी 300 महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला यात महिला दिनाच्या निमित्ताने विरांगणा महिलांना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. यावेळी या सर्यफिकेट संबंधी माहिती देतांना वैशालीताई सोनवणे यांनी सांगितले की ह्या प्रमाणपत्रमुळे विरांगणा महिलांना फ्री रेशन मेडीकल सुविधा त्याचप्रमाणे तीन हजार रुपये मानधन व महिलांना शिवणयंत्र अशी सुविधा मिळण्याबरोबरच शासकीय कामांमध्ये या कार्डचा फायदाच होईल सदर कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष व दुगाव ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई सोनवणे, सरपंच संजय सोनवणे, दुगांवच्या उपसरपंच अलकाबाई , सदस्य नवल सोनवणे, पप्पु सोनवणे, वैशालीताई क्षिरसागर, केदाबाई खरात, पोलीस पाटील बाळू पाटील यांचेसह  दुगांव व परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments