चांदवडः मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियानाचे जिल्हास्तर पारितोषिक वितरण....नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते जिल्ह्यातील ०९ शाळांचा गौरव व पारितोषिक वितरण समारंभ चिंतामणी लॉन्स, सोयगाव मालेगाव येथे संपन्न झाला.
या प्रसंगी मा.ना.दादाजी भुसे, मा.डॉ.नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक, मा. भास्कर कनोज उपशिक्षणाधिकारी व मा.धनंजय कोळी, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक, मविप्र समाजचे मालेगाव तालुका संचालक, मुख्यालयाचे विस्तार अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी हे प्रमुख अतिथीं म्हणून उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष दादाजी भुसे यांनी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवावी असे आवाहन केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात 'अ' गटात जिल्हा परिषद शाळा विभागात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा शिवडे ता. सिन्नर, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा कुंभारी, ता. निफाड तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा रेडगाव, ता. चांदवड तर 'ब' गटातील खाजगी शाळांमध्ये
प्रथम क्रमांक प्राथमिक आश्रम शाळा मोहपाडा, ता. सुरगाणा, द्वितीय क्रमांक नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड, तृतीय क्रमांक एन.एम.सोनवणे कला व वाणिज्य महाविद्यालय बागलाण तसेच महानगर पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये
प्रथम क्रमांक मनपा शाळा क्रं. २४ विश्वासनगर, सातपूर, नाशिक, द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल आडगाव ता. नाशिक, तृतीय क्रमांक सेंट फिलोमिना कॉन्व्हेंट हायस्कूल, नाशिकरोड, ता. नाशिक या शाळांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारितोषिकाची रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शाळांचे गावांतील सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,पालक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments