संपादक - सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय बाल चित्रकला स्पर्धा व गोमाता संस्कृती चित्रकला स्पर्धेत सुयश संपादित केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चांदवड पंचायत समिती तालुकास्तरावर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी निलेश पवार, चैतन्य काशिनाथ अहिरे, शैलेश शांताराम पवार, ओम भास्कर गांगुर्डे, प्रियंका मनोज जांगिड, साईराज प्रदिप रोकडे या विद्यार्थ्यांनी तर पूर्वा केमटेक प्रा.लि.बसवंत गार्डन पिंपळगाव यांच्यातर्फे आयोजित गोमाता संस्कृती चित्रकला स्पर्धेत ५वी ते ७वी या गटात मनिष राकेश गोसावी, सोहम धनंजय राऊत, कृष्णा सोहम शर्मा, सिद्धी नागेश ठाकरे, अरिबा असलम बागवान, शुभम दत्तू सोनवणे, मयूर भाऊसाहेब पाटील, आदिती सोमनाथ मापारी, सर्वेश संदिप वन्से, सुजल सचिन शिंदे, मिनाक्षी अशोकराम प्रजापत, लक्ष्मी सोहम शर्मा या विद्यार्थ्यांनी चित्राविष्कार सादर केले होते.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, पर्यवेक्षक रविंद्र पवार, तांत्रिक विभाग प्रमुख प्रशांत सुताणे त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या यशवंत विद्यार्थांना विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment
0 Comments