Type Here to Get Search Results !

कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या संवाद यात्रा दौऱ्या निमित्त चांदवड ला काँग्रेसची बैठक संपन्न



चांदवड : आज दि ०६रोजी दुपारी  ४वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मार्केटयार्ड सेल हॉलमध्ये राष्ट्रीय कॉग्रेस  तालुका अध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षते खाली मिटिंग आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी कार्यकर्त्याच्या बैठीकीस उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. मा राहुलजी गांधी यांच्या भारतजोडो यात्रा निमित्ताने दि १४/०३/२०२४ गुरुवार रोजी सकाळी ८.३० वाजता चांदवड ला येणार असल्यामुळे  आज  बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नियोजन कसे करायचे यावरती चर्चा करुन प्रत्येक कार्यकर्त्याला कामे नेमून दिली. तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना पर्यंत मेसेज, कॉल करुन संपर्क करा व जनमानसापर्यंत पोहचा अशी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.तसेच जास्तीत लोकांनी या संवाद यात्रेला उपस्थित राहण्याचे आव्हान माजी आमदार शिरीष कोतवाल व चांदवड तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी केले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments