🎤संपादकः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः स्त्री ही सामर्थ्याचा प्रचंड स्रोत प्राचार्य संजय लोहकरे यांचे यांचे गौरव उद्गार
श्रीमती जे.आर. गुंजाळ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे महिला दिनाच्या निमित्ताने चांदवड शहरातुन मतदान जागृती फेरी व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे,पर्यवेक्षक प्रकाश आहेर केंद्रप्रमुख संदिप महाले उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख वाल्मीक कुरणे, वाचनालयाचे प्रमुख दिलीप घोगरे, प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचे फलक हाती धरून अनेक घोषणांनी चांदवड शहरातील परिसर दुमदुमून गेला. मतदान फेरीच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यात आली.विद्यालयाच्या वतीने सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे उपशिक्षकअडसरे सर यांनी आपल्या भाषणात कर्तुत्ववान महिलांच्या कार्याचा परिचय करून दिला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय लोहकरे यांनी महिला ही सामर्थ्याचा प्रचंड स्रोत असल्याचे गौरवउद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर काळे यांनी केले गरुड सर यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments