चांदवड: येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदवड येथील कृषी विभागाच्या गट क्र. ६११ येथील जागेवर कृषीभवन इमारत बांधकामासाठी रू.१४६७.३० लक्ष (चौदा कोटी सदुसष्ठ लक्ष,तीस हजार रुपये) इतक्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
चांदवड तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदवड अधिनस्त तीन मंडळ कृषी अधिकारी वडाळीभोई,दुगाव व चांदवड या कार्यालयाकरिता कृषी विभागाच्या चांदवड येथील गट क्र.६११ येथील जागेवर कृषी भवन इमारत बांधकामासाठी संचालक,मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थपन् कृषी आयुक्तालंय पुणे यांनी शासनास प्रस्ताव सादर केला होता त्यासाठी आ.डॉ. राहुल आहेर यांनी शासनस्त रावर पाठपुरावा करून कृषी भवन इमारत बांधकामासाठी सदर निधी मंजूर करून घेतला आहे.
सदर कृषी भावनाच्या इमारतीमुळे चांदवड तालुक्यातील तीन मंडळातील कामकाजाच्या दृष्ठीने तसेच कृषी विभागाचा लोकसंपर्क लक्षात् घेता तसेच शासनाच्या माध्यमातून कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात सदर कृषी भावनाच्या इमारतीमुळे तालुक्यातील जनतेला एकाच छताखाली कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणे शक्य होणार असल्याने तालुक्यातील जनतेचा पैसा व वेळ वाचण्यास या संकुलामुळे मदत होईल असे आ.डॉ.राहुल आहेर यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments