Type Here to Get Search Results !

एसएनजेबी एमबीए तर्फे अस्तित्व- २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न.

संपादकः सुनिल आण्णा सोनवणे
 चांदवड: येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित नॅक "अ+" मानांकित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातर्फे  'अस्तित्व' २०२४ हा  राज्यस्तरीय मॅनेजमेण्ट  इव्हेंट संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी देवळा ऍग्रो प्रोडूसर कंपनी लि. देवळा व न्यू  श्रीनिवास ज्वेलर्स  पिंपळगाव यांनी या कार्यक्रमाचे  मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते. तसेच विविध खाद्यपदार्थ आणि  वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. 
  या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एसएनजेबी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले. राज्यातून तसेच  विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सातशेहुन अधिक  विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमात  नृत्य, रील्स कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, बॉक्स क्रिकेट, रांगोळी स्पर्धा, वन मिनिट शो, फॅशन शो, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा इत्यादी  स्पर्धा ऑनलाईन व ऑफलाइन पध्दतीने  घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या  यशस्वी आयोजनासाठी एमबीए विभाग प्रमुख डॉ.ए. आर. बोरा व इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रा.एम. एस. बरकले तसेच   सर्व प्राध्यापकांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी महाविद्यालयातर्फे विजेत्यांना कॅश प्राईझेस आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम.आर. संघवी यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह  सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments