Type Here to Get Search Results !

चांदवड येथील एस एन जे बी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये " आर्डिनो प्रोग्रामिंग आणि पीसीबी डिझाईनवर " वर्कशॉपचे आयोजन.

 संपादक : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड: येथील नॅक मानांकित 'अ+ ' दर्जाचे   श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या व्दितीय आणि तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी  दोन दिवसांचे "आर्डिनो प्रोग्रामिंग आणि पीसीबी डिझाईनवर " वर्कशॉप  घेण्यात आले . वर्कशॉपसाठी "मोटर ऑटोमेशन टेक्नॉलॉजी " लासलगाव  येथील  प्रशांत कदम यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील ३५ विद्यार्थी सहभागी झाले.
स्वयंचलित उत्पादनात आणि उपकरणात मायक्रोकंट्रोलर वापरले जातात, जसे गाडीची इंजिन प्रणाली, रिमोट कंट्रोल, मशीनी, साधने, ऊर्जाशिल अवजारे, आणि खेळणी. आजकालच्या जगात माणसांपेक्षा जास्त काम मशिन्स   करतात. कंपन्यांमध्येही मशिन्सच्या माध्यमातूनच सर्वाधिक काम केलं जातं. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना मायक्रोकंट्रोल हार्डवेअर , सॉफ्टवेअर,प्रिंटेड सर्किट बोर्ड  डिझाईन आणि प्रोग्रामिंग शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी या  उपक्रमाचे  आयोजन  प्रा. एस. एस. ठाकरे यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .जी.तातेड, उपप्राचार्य डॉ.एम. आर.संघवी ,विभाग प्रमुख डॉ.आर. के.अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  सदर वर्कशॉपच्या  यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती,  विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा,  सेक्रेटरी जवाहरलाल  आबड,  प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा,  उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
 चांदवड येथील एस एन जे बी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये “आर्डिनो प्रोग्रामिंग आणि पीसीबी डिझाईनवर " वर्कशॉपचे आयोजन करण्यात  आले . याप्रसंगी सिनियर ट्रेनर  प्रशांत कदम , प्रा. एस. एस. ठाकरे  समवेत सहभागी विद्यार्थी आदी.

Post a Comment

0 Comments