संपादकः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये पक्षांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी, त्यांनी पक्ष्यांचे संवर्धन करून माहिती घ्यावी या उद्देशाने दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घरटे व दाणा पाण्याचे भांडे तयार करण्याचा उपक्रम कला कार्यानुभव अंतर्गत घेतला जातो. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
२० मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून व सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे विविध पक्षी, चिमण्या दाणा पाण्यासाठी फिरताना दिसतात. तसेच वृक्षतोडीमुळे पक्षांना घरटे बनवण्यासाठी फिरावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून घरातील टाकाऊ वस्तूंपासून दाणा पाण्याचे भांडे तयार केले व पुठ्याचा वापर करून पक्षांसाठी निवारा म्हणून कृत्रिम घरटी बनविली. या वस्तू विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या गॅलरीत, बागेत सावलीच्या ठिकाणी लावणे व आपल्या घराच्या परिसरात येणाऱ्या विविध पक्षांची माहिती घेणे, पक्षी निरीक्षण करणे, पक्ष्यांच्या हालचाली, रंग त्यांच्यातील वेगळेपण, याविषयी टिपण करणे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन विद्यालयाचे कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांनी केले. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ वस्तु पासून पक्षांसाठी दाणा पाण्याची भांडी व कृत्रिम घरटी तयार करून विद्यालय परिसरातील झाडांना बांधलीत विद्यार्थी नियमितपणे या भांड्यांमध्ये दाणा पाण्याची व्यवस्था करून पक्ष्यांप्रती सामाजिक बांधीलकी जपणार आहेत.
विद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रविंद्र पवार यांच्यासह विद्यालयातील घटकांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments