Type Here to Get Search Results !

दहा हजाराची लाच घेताना कुंदलगाव येथील तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

    
संपादक : सुनिलआण्णा सोनवणे    
चांदवड: तालुक्यातील कुंदलगाव येथे शेत जमिनीवरील फेरफार करण्यासाठी कुंदलगाव तलाठी कार्यालयातील तलाठी यांनी लाचेची मागणी केल्याने सदरच्या प्रकरणातील तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच  मामांच्या मुली व  मावशी  यांनी  कुंदलगाव ता .चांदवड  येथील शेती वाटप करण्यासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार  कुंदलगाव ता. चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमिनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची  सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता. तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील तलाठी यांच्या कडे देण्यात आला होता  या कामासाठी यातील आलोसे तलाठी  विजय राजेंद्र जाधव   (वय 33 वर्ष)  पद - तलाठी सजा शिंगवे, (अतिरिक्त कार्यभार कुंदलगाव ता .चांदवड जि .नाशिक) तसेच राहणार:- श्रम साफल्य कॉलनी ,प्लॉट नंबर 11,वडेलरोड ,वलवाडी  ,देवपूर ,धुळे. यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी केली व त्यातील दहा हजार रुपये स्वीकारताना पंचांसमक्ष त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .
सदरच्या प्रकरणात सापळा अधिकारी विश्वजीत पांडुरंग जाधव (पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत  प्रतिबंधक विभाग, नाशिक) यांचे सह                                                   
पोलीस हवालदार प्रणय इंगळे 
पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे 
चालक पोलीस हवालदार विनोद पवार (सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक) यांनी यशस्वी पद्धतीने सापळा रचून सदर लाचखोर कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे व त्याचे वर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या सापळ्यात मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक), यांच्या व मा .श्री माधव रेड्डी
(अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री नरेंद्र पवार (वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक.) यांच्या सहकार्याने सदरचा सापळा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
याद्वारे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचे वतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी  अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग,नाशिक येथे संपर्क करावा. त्यासाठी दुरध्वनी क्रमांक:- 0253 2578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ यांचे वर संपर्क करावा

Post a Comment

0 Comments