Type Here to Get Search Results !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण व अभ्यासिकेसाठी १ः५० कोटी मंजुर केल्याबद्दल आ.राहुल आहेर यांचा भव्य सत्कार

संपादकः सुनिल आण्णा सोनवणे,
मा.आ.राहुल दादा आहेर यांचा जाहीर सत्कार 
आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला होता.गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चौक येथील रहिवाशी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील प्रशस्त जागेवर   सभामंडप व सुसज्ज ग्रंथालय बनावे अशी मागणी होती.त्या अनुषंगाने आंबेडकर चौकातील सर्व तरुण कार्यकर्ते व महिला मंडळ व धम्म बांधवांनी वरील कामाची एकमुखी निवेदन व चर्चेद्वारे मा.आ.राहुल दादा आहेर यांच्याकडे केली असता त्यांनी या मागणीचा त्यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा करून सदर कामाचा निघी मंजुर करून आणला..त्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या व रहिवाशी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला..सदर कार्यक्रमासाठी मा.आ.समवेत डॉ.नितीन गांगुर्डे,तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, अशोक काका व्यवहारे,बाळासाहेब वाघ, अँड भवर, झाल्टे ताई,वाल्मीक वानखेडे,दिगंबर वाघ,विजय धाकराव,मिलिंद खरे,संजय बनकर,कैलास निरभवणे,शिवाजी बनकर,अरुण बनकर,प्रमोद जाधव,संदेश जाधव,प्रवीण साळवे, देविदास बनकर,राजेश अहिरे,देविदास जाधव,संजय निरभवणे,संजय निकाले,संतोष भदाने ,किशोर हिरे,किशोर आढाव,सागर गोडबोले,अलकाताई बनकर,बेबीताई जाधव,सिंधुताई लोखंडे,सुलोचना भडांगे,लीलावती भडांगे,मायावती निरभवणे,अनिता केदारे, ज्योती धिवर,वंदना जाधव,रुपाली जाधव,प्रतिभा साळवे,छाया बनकर,आशा साबळे, केंदुबाई भडांगे आदी महिला उपस्थित होत्या.अँड. विकास जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ केदारे होते तसेच प्रास्तविक पांडुरंग भडांगे यांनी केले,अनुमोदन उमेश जाधव यांनी दिले व सूत्रसंचालन संजयजी भडांगे यांनी केले..

Post a Comment

0 Comments