Type Here to Get Search Results !

चांदवड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आमदार डॉ.राहुल आहेर यांनी घेतली आढावा बैठक

🎤संपादकः सुनिल आण्णा सोनवणे🎤
आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आज चांदवड व देवळा तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात मतदारसंघातील अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली या बैठकीत तालुक्यात भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच तालुक्यात मुबलक पाणी कुठे उपलब्ध आहे व ते किती दिवस पुरेल यासंबंधी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली जनावरांसाठी चारा कसा उपलब्ध होईल व किती झाला तालुक्यातील जनावरांसाठी आवश्यक आहे याचीही माहिती आमदार डॉ.राहुल आहेर यांनी यावेळी घेतली व नियोजन करण्याचे आदेश आमदार डॉ.राहुल आहेर यांनी दिले 

 चांदवड नगरपरिषद शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी मिळेल असे नियोजन लवकरात लवकर करा असे मुख्य अधिकारी डाके यांना सांगितले त्याचबरोबर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व विभागांनी आपापल्या परीने योग्य ते नियोजन करावे असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले
यावेळी उपविभागीय अधिकारी कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, गटविकास अधिकारी मच्छीन्द्र साबळे, आर एफ ओ ढोमसे, बाळासाहेब वाघ, संदीप उगले, डॉ.नितीन गांगुर्डे, अशोक व्यवहारे, राजेश अहिरे, राजेश गांगुर्डे, साईनाथ कोल्हे ,योगेश ढोमसे, विजय धाकराव तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments