Type Here to Get Search Results !

नेमिनाथ जैन विद्यालयाचे एन.एम.एम.एस परीक्षेत सुयश. प्राचार्य शिवदास शिंदे यांचेकडून विदयार्थ्याचे अभिनंदन..

        संपादक : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील एन.एम.एम.एस परीक्षेत ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस परीक्षेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी ३० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवित यश संपादित केले आहे.
विद्यालयातील या गुणवंत विद्यार्थ्यांचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र  पारख यांनी मनःपूर्वक कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या उपशिक्षिका वैशाली भामरे आणि उपशिक्षक हंसराज मोरे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रविंद्र पवार तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर सहकारी यांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments