चांदवड: येथील नॅक मानांकित ‘ अ + ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एम. एम राठोड हे उपस्थित होते.
याच दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन व विद्यार्थ्यांसाठी मातृभाषेचे महत्त्व या विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले काव्य सादर केले. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड व उपप्राचार्य डॉ. एम आर संघवी व डॉ. एम.बी केदार आदीचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय सहाय्यक गुजराथी एस. व्ही., शेळके वाय. आर. व पवार एस एस आदीनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड उपप्राचार्य डॉ.एम आर संघवी, सर्व विभागप्रमुख , प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments