चांदवडः श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्य.व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती व म.वि.प्र. संस्थेचे आधारवड ॲड कर्मवीर बाबुराव ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक प्रकाश आहेर, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख वाल्मिक कुरणे, प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, प्रकाश आहेर यांनी थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज व कर्मवीरॲड. बाबुराव ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षका कोमल ठाकरे यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच म.वि.प्र. प्र संस्थेचे आधारवड कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात सांगितले की संत गाडगेबाबा महाराज यांनी संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतले व समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच ॲड. बाबुराव ठाकरे यांनी आपले जीवन म.वि.प्र. संस्थेच्या विकासासाठी व शिक्षण कार्यासाठी वाहून घेतले असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता राजगुरू यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर काळे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments