Type Here to Get Search Results !

श्रीमती.जे.आर.गुंजाळ विद्यालय चांदवडचे शासकीय चित्रकला परीक्षेत सुयश


चांदवड : श्रीमती. जे.आर.गुंजाळ विद्यालय,चांदवड या विद्यालयाने शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. इंटरमिजिएट परीक्षेत विद्यालयाचा निकाल १००%  लागला असून या परीक्षेला एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यात ब श्रेणीत ५, क श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलिमेंट्री ग्रेड परीक्षेचा निकाल ९७.६१% लागला.यात ब श्रेणीत ४, क श्रेणीत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल मा.मुख्याध्यापक श्री. लोहकरे एस.एन.पर्यवेक्षक श्री.आहेर पी.एम.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे.सर्व गुणवंतांचा विद्यालायातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री. ठोके ए.डी, श्री. पाटील एस.एन. यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments