चांदवड:- राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यालयामध्ये शिवव्याख्यान आणि आरतीचे आयोजन करत जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
स्वराज्य संस्थापक, प्रभो शिवाजीराजा यांच्या ३९४ व्या जन्मोस्तवाच्या कार्यक्रमात विद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश महाले यांना प्रमुख अतिथी आणि शिवव्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच त्या नंतर शिवार्तीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेश महाले यांनी महाराजांच्या जीवनपट उलगडणारे अनेक प्रसंग आपल्या व्याख्यानातून सांगितले. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या गुणांचा आंगिकार आपण केला पाहिजे असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आठवणच आपल्या मनोगतातून करून दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक रविंद्र पवार यांनी कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तर संगीत शिक्षिका संगीता चव्हाण यांनी पाळणा गीताचे सादरीकरण केले.
विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतातून महाराजांच्या शौर्यगाथा प्रस्तुत केल्या.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सुनिल बुरड, राजेश चव्हाण, निलेश निकम, सचिन सिसोदिया, हृषिकेश दायमा, रेखा शुक्ला, दिपाली हिरे, सुनिल रकीबे यांनी केले.
या उत्सवाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments