Type Here to Get Search Results !

चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग २ के २४ संपन्न.

 संपादकीयः सुनिल अण्णा सोनवणे चांदवड
चांदवड : येथील नॅक मानांकित ' अ +' दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित  स्व.सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग २  के २४  या वार्षिक स्नेहसंमेलनाचे तीन दिवस  आयोजन करण्यात आले होते  अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  आर. जी.  तातेड  यांनी दिली.
सदर स्नेहसंमेलनात पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात आर्ट एक्स्जिबिशनमध्ये  बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, रांगोळी स्पर्धा,  मेहंदी स्पर्धा, फोटोग्राफी, पोस्टर प्रेसेंटेशन, पेन्सिल स्केच आदींसह रामायण थीम रॅली , सप्तरंग २  के २४   उद्घाटन सोहळा तसेच ट्रॅडिशनल डे, ग्रुप डे,  बॉलीवूड डे , अंताक्षरी व स्टॅन्ड अप कॉमेडी, फन फेयर , विविध खेळांच्या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा व संघाचा बक्षीस वितरण कार्यक्रम. साडी डे, टाय डे ,मिस्टर अँड मिस एसएनजेबी तसेच  कार्यक्रमाची सांगता कला व सांस्कृतिक कार्यक्र.माने करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस महाराष्ट्र २०२२  डॉ सोनल मिरचंदानी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  सरस्वती पूजन  व संस्थेचे संस्थापक पूज्य काकाजी यांच्या प्रतिमा पूजनाने  करण्यात आली. यावेळी  दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी,  यांनी  सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सहभागी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपल्या अंगभूत कला गुणांचे प्रदर्शन करत उत्कृष्ट प्रकारचे गायन, वादन , नृत्य व समूह नृत्य, नाटिका आदी  सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

तसेच  या स्नेहसंमेलना अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमात  गायनचे  परीक्षण पिंपळगाव (ब)येथील प्रसिद्ध  
गायक  हरीश भाई ठक्कर व प्रकाश भाऊ गोसावी यांनी केले तर नृत्याचे परीक्षण रिटा अशोक पंडित व अमोल शिंदे यांनी केले.

या स्नेहसंमेलनाचे आयोजन स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.कुलकर्णी वाय.एस. व   प्रा. ठाकरे एस. एस. तसेच सांस्कृतिक समन्वयक प्रा. पवार डी.पी. तसेच गॅदरिंग सेक्रेटरी संकेत गांगुर्डे,  विद्यार्थिनी प्रतिनिधी स्नेहा कापडणीस,   सांस्कृतिक प्रतिनिधी पार्थ कापडणीस,  क्रीडा प्रतिनिधी ओमकार भालेराव यांनी  व त्यांच्या संपूर्ण टीमने  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जी.  तातेड व उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली  केले.
  याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
सदर कार्याक्रमचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या  विश्वस्त समितेचे अध्यक्ष  बेबीलाल संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक  दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी  जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष  अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष  अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे  सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक  झुंबरलाल भंडारी व   सुनीलकुमार चोपडा  आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व प्रबंध समितीचे सर्व  सदस्य, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.

Post a Comment

0 Comments