Type Here to Get Search Results !

मराठ्यानो घात होतोय आपला १९६७ पुर्वीचा पुरावा व ओबीसी आरक्षणच योग्य : प्रविणदादा गायकवाड

प्रवीणदादा गायकवाड गेली 4-5 महिने EWS आणि 1967 च्या आधीच्या कुणबी नोंदी हेच खरं आरक्षण आहे,यापलीकडे काहीही दुसरं आरक्षण मिळणार नाही,सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय हे जीव तोडून सांगत समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते. पण मराठे वाचतील,ऐकतील तर शपथ...त्यामुळे आज खुट्टा मराठा समाजाच्याच ठोकला गेलाय हे अजूनही मान्य नसेल तर मागासलेपणाच्या लढाई पासून भीक मागण्या पर्यंतच्या प्रवासाला 'वाशीतील काशी इतक्या' उत्तुंग गर्दीमय शुभेच्छा... 
या सगळ्या गर्दीच्या उन्मादात आज खूप मोठं नुकसान आपण करून बसलो,आजचं हे फसवं 10% कोर्टात तोंडावर आपटेपर्यंत सुप्रीम कोर्ट व दोन्ही सभागृहांत पारित झालेले हक्काचे EWS चे 10% आरक्षण मराठा गमावून बसला आहे.
जरी निवडणूक झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आजची फडणविसी चाल नाकारली तरी तोवर 2024-25चे शैक्षणिक प्रवेश होऊन गेलेले असतील.या वर्षातील शैक्षणिक प्रवेश व काही नोकऱ्याही यात तोवर आपण गमावलेल्या असतील.

संतोष यशवंत गायधनी.

Post a Comment

0 Comments