दैनिक आवाज : सुनिलआण्णा सोनवणे,
*चांदवड*: तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद येथे खोटी कागदपत्र सादर करून शासकीय अनुदानातून वेतन काढत फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या निर्देशानुसार चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर स्वामी विवेकानंद विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अनिल गोविंद गांगुर्डे, सुनील गोविंद गांगुर्डे व मुख्याध्यापक तुळशीराम महादू पेंढारी अशा तिघांवर प्रभाकर देवमन पेंढारी यांच्या फिर्यादीनुसार बनावट कागदपत्र तयार करून शासकीय अनुदानातून पगार काढण्याचे काम केले व सुनील गांगुर्डे यांना नोकरी मिळवण्यासाठी इतर दोघांच्या मदतीने खोटे कागदपत्रे तयार करत फसवणूक केली . सदरच्या घटनेमुळे न्यायालयाच्या आदेशाने चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पीएसआय सुरेश चौधरी हे करत आहेत.
Post a Comment
0 Comments