Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 
        संपादक : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः   "माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा"...
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
प्रसिद्ध कवी, लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी विद्यालयातील प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक व इतर मान्यवर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या निमित्ताने विद्यालयाचे पर्यवेक्षक रविंद्र पवार आणि ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा शाकद्वीपी यांनी कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर उपशिक्षिका ललिता कर्णावट यांनी मराठी भाषेची प्रचिती देणारे मनोगत सादर केले. तर संगीत विभाग प्रमुख संगीता चव्हाण यांनी ७ वी च्या मराठी कवितेचे    विद्यार्थ्यांसमवेत गायन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायली केदारे व राधिका जाधव यांनी केले. तसेच विद्यालयातील जिज्ञासा बागुल, कृतिका शेलार या विद्यार्थिनींनी  मराठी भाषेचा गौरव करणारी मनोगत मांडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदिप गुळेचा, लोकेश जैन, सुनिल रकीबे, प्रविण देशमुख, अर्चना देवरे, रोहित सोनवणे,  संतोष मते यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments