Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन....


चांदवडः श्री नेमिनाथ जैन विद्यालयात
सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त कवितांचे गायन करून आदरांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुष, प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयचे पर्यवेक्षक रवींद्र पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी वि.दा.च्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंगांची माहिती देणारी मनोगते सादर केली. तसेच ६ वी च्या चिमुकल्यांनी सावरकरांच्या जयोस्तुते या कवितेचे गायन करत कार्यक्रमाचे शोभा वाढवली.
याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक योगेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर रोशन नेरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ललिता कर्नावट,संदिप गुळेचा, शैलेश जैन यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments